शांतिस्वरूप भटनागर यांच्या जन्मासोबत आज आणखी काय विशेष ??

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । आजचे दिनविशेष | आज दि. २१ फेब्रुवारी २०२०. प्रत्येक दिवस काहीतरी खास आठवणी घेऊन येत असतो. काही आठवणी इतिहास बनून जातात तर काही लोकांना माहिती म्हणून उपयोगी पडतात. अशाच काही दिनविशेषांवर एक नजर..

विशेष – शांतिस्वरूप भटनागर – हे एक प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक होते. त्यांचा जन्म शाहपुरात (आता पाकिस्तानात) झाला. वडील परमेश्वरी सहाय भटनागर यांचे शांतिस्वरूप भटनागर आठ महिन्यांचे असताना निधन झाले. १९४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्यानंतर श्री भटनागर यांच्या अध्यक्षतेखाली वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची स्थापना केली गेली. त्यांना सीएसआयआरचे पहिले महासंचालक केले गेले. तसेच त्यांना संशोधन प्रयोगशाळांचे जनक म्हटले जाते आणि भारतात अनेक मोठ्या रासायनिक प्रयोगशाळेच्या स्थापनेसाठी त्यांची आठवण येते. त्यांनी भारतात एकूण बारा राष्ट्रीय प्रयोगशाळेची स्थापना केली.

आता बाकी घडामोडी..

१) १८२९ – ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी पहिली भारतीय स्त्री – राणी चेन्नमा यांचं निधन

२) १८९४ – रसायनशास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर यांचा जन्म

३) १८९९ – ‘निराला’ या नावाने प्रसिद्ध असणारे कवी, कथा-कादंबरीकार सूर्यकांत त्रिपाठी यांचा जन्म

४) १९९३ – बंगाली क्रांतिकारक वीरेंद्रनाथ फासावर

५) १९४१ – इन्शुलिनचे संस्थापक सर फ्रेडरिक ग्रँट बेटिंग यांचं निधन

६) १९३२ – आचार्य विनोबा भावेंकडून धुळ्याच्या तुरुंगात गीताप्रवचनांना सुरुवात

७) १९७२ – महाराष्ट्र बँकेचे संस्थापक सदस्य, खासदार आणि घटना समितीतील एक सदस्य भालचंद्र बापूसाहेब गुप्ते यांचं निधन

८) १९९१ – सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री नूतन हिचे निधन

९) २०१४ – सरकारविरोधी निदर्शनात झालेल्या गोळीबारात मिस व्हेनेझुएला ग्रेनसिस कार्मोना मृत्युमुखी

१०) साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त उडिया कवी राधामोहन गरनाथक यांचं निधन