करिअरनामा ।मुंबई महानगरपालिका शाळांमधील आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या रकमेच्या ठेवी यापुढे पोस्ट खात्यात ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतल आहे. आधी पंजाब नॅशनल बँकेत या ठेवी ठेवल्या जात होत्या. या निर्णयात बदल केल्यामुळे तब्बल ७ कोटी ६६ लाखांची रक्कम थेट टपाल खात्यात गुंतवण्यात येत आहे.
प्रोत्साहन भत्ता देण्यापाठीमागचा उद्देश –
1) महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिंनींची पटसंख्या वाढवणे.
2) विद्यार्थिंनींची संख्या कायम राखणे.
3 ) उपस्थितीचे प्रमाण वाढवणे.
पालिकेने प्रत्येक विद्यार्थिनींसाठी 2007-08 मध्ये प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रतिदिन 1 रुपया देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2009-10 पर्यंत 500 ते 2500 रुपयांची रक्कम विद्यार्थिनींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.
पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना 2500 रुपये दिले जात असत.एकूण 16 हजार481 एवढ्या मुली असून त्यांच्यासाठी एकूण 7 कोटी 66 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून देय आहे. त्यामुळे ही सर्व रक्कम बँकेऐवजी पोस्टात भर जाणार आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”