करिअरनामा । अहमदनगर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सावेडीच्या रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहात होणार आहे. यावेळी ११ विविध कंपन्या त्यांच्याकडील रिक्त १९० वर जागांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती या मेळाव्यात घेणार असून, यातून नोकरीसाठी अंतिम निवड केली जाणार आहे. या मेळाव्यात नगर एमआयडीसी व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नामांकित कंपन्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे मेळाव्यास येणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्याकडील रिक्तपदासाठी आवश्यक असलेल्यांची निवड करणार आहेत.
रोजगार मेळाव्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नावनोंदणी व अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील Job Seeker हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्डने Sign in केल्यानंतर होम पेज दिसेल.
या पेजवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा-अहमदनगर’ हा पर्याय निवडावा. Ahmednagar जिल्हा निवडल्यानंतर गुरुवार १३ फेब्रुवारीला होणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावासाठी उपस्थिती नोंदवण्यात यावी व I agree हा पर्याय निवडून आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्याच्या रिक्त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे व आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job