करिअरनामा ।माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आघाडीची कॉग्निझंट टेक्नॉलॉजी कंपनी चालू वर्षात तब्बल 20 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कॉलेज कॅम्पसच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे .
अभियांत्रिकीच्या पदवीधरांची निवड करताना पॅकेजमध्ये 18 टक्क्यांची वाढही करण्यात आली आहे. यामुळे कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना किमान 4 लाखांचे वार्षिक वेतन मिळणार आहे.
कॉग्निझंटने काही दिवसांपूर्वीच जगभरात 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे जाहीर केले होते. मात्र, भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची कंपनीची योजना आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉग्निझंट 2 लाख कर्मचारी असणारी देशातील दुसरी “आयटी’ कंपनी बनली होती. देशातील सर्वाधिक कर्मचारी असणारी बहुराष्ट्रीय कंपनी बनली आहे.
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”