करिअरनामा । महाविद्यालयांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीपर्यंत महाविद्यालयांना महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावे लागणार आहेत.
दरम्यान सन २०१९-२० साठी महाडीबीटी प्रणालीवर अनुजाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुक्ल, परीक्षा शुक्ल योजनेचे अनेक अर्ज अद्यापही महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांनी हे प्रलंबित अर्ज जिल्हा लॉगीनवर सादर करण्यासाठी २२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली असून, अनेक महाविद्यालयांनी आॅनलाइन अर्ज सादर केली नाहीत. त्यामुळे समाजकल्याण कार्यालयाकडून २० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.