अंगणवाडी सेविकांची 6500 रिक्त पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा। अंगणवाडी सेविकांची साडेसहा पदे भरण्याचा आणि  भाडेतत्वावर सुरू असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतींच्या भाड्यात ग्रामीण भागासाठी चार हजार रुपये तर शहरभागासाठी सहा हजार रूपये मासिक भाडेवाढ करण्याचा निर्णय महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे .

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस पदे भरण्यावर तीन वर्षांपासून निर्बंध लावण्यात आले होते. आता हे निर्बंधही  हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सेविका व मदतनीसच्या साडेसहा हजार जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे .

अंगणवाडी सेविकेसाठी अर्ज करू शकणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे .या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल .

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”