करिअरनामा ऑनलाईन | काही लोकांच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात ज्या घटना त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते. महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थि सापडतील ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींचा सामना केला. आणि शेवटी अधिकारी झाले. अशीच एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये कॉलेजच्या गावाकडील कॉलेजमध्ये दादा आणि भाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका तरुणाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टीला सामोरे जावे लागेल की, तो तरुण त्यातून धडा घेऊन पुढे पीएसआय झाला.
ही गोष्ट आहे औरंगाबाद जवळील एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये राहणाऱ्या आणि गावचे जीवन जगणारे विजय नाचण् यांची. गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या विजय यांच्या आईची इच्छा होती कि, विजय यांनी मोठे होऊन अधिकारी व्हावे. यासाठी विजय औरंगाबादमध्ये शिकण्यासाठी आले. पण तिकडे आल्यावर त्यांना राजकारणाचा नाद लागला व कॉलेजमध्ये भाईगिरीसाठी ओळखू लागले. पण एकदा कॉलेजमध्ये एकदा अशी काही घटना घडली ज्यामुळे एका पीएसआयने सर्व मुलांच्यासमोर त्यांच्या कानाखाली मारली. व त्यांनी यामधून आता पीएसआय च व्हायचे असे ठरवून टाकले. या निर्णयाचा गावातील सर्वांनी खिल्ली उडवली पण त्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स अजिबात कमी होऊ दिला नाही.
यानंतर 2017 मध्ये पूर्व परीक्षा दिली. व पास झाले. पण त्यानंतर खरी कसोटी लागणार होती ती फिजिकल आणि मुलाखतीमध्ये. सर्व झाले आणि रिझल्टचा दिवस उजाडला. मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितले की, पीएसआय चा निकाल लागला तेव्हा झालेला आनंद हा खूप मोठा होता. ज्या कॉलेजमध्ये मला कानाखाली मारली होती आणि माझी भाई म्हणून ओळख होती, तिथेच माझा सत्कार करण्यात आला. विजय नाचण यांची कहानी अनेकांसाठी प्रेरणादायक आहे यातून अनेक विद्यार्थ्यांनी मोठी शिकवण घ्यायला हवी.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com