Breaking News : कोल्हापूर येथे होणारी 2021 ची सैन्य भरती रद्द

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन | कोल्हापूर येथे होणारी सैन्य भरती कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत भारतीय सैन्य दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे. सैन्य भरतीसाठी पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व गोवा राज्यातील सैन्य भरतीचे अर्ज भरणाऱ्यांना या भरतीला मुकावे लागणार आहे.

कोल्हापूर येते पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्यातील उत्तर व दक्षिण गोव्यातील युवकांची सैन्य भरती होणार होती. या भरतीत सैनिक जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क / स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन, एचएव्ही एसव्ही ऑटो कार्टो (एसएसी), जेसीओ (आरटी) धार्मिक शिक्षक या पदासांठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 20 फेब्रुवारी 2021 ही शेवटची तारीख होती. त्यामुळे भरतीसाठी मुलांनी अर्ज भरले होते. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर येथे होणारी भरती रद्द करण्यात आली आहे. कोरोनाने भरती रद्द झाल्याने पश्चिम महाराष्ट्रासह, कोकण व गोव्यातील तरूणांचे लष्करात भरतीचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.

अधिकृत माहिती – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com