पुणे : 12 च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा साठीचे प्रवेश पत्र उद्यापासून(3 एप्रिल ) ऑनलाईन मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून दिली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट महाविद्यालयाच्या लॉगइन मध्ये उद्यापासून (3एप्रिल) पासून उपलब्ध होणार आहे.
बारावी बोर्डाची परीक्षा येत्या 23 तारखेपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी लागणारे प्रवेश पत्र हे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांनी घ्यावयाचे आहे. हे प्रवेश पत्र प्रिंट स्वरूपात महाविद्यालयातून घ्यायचे आहे.
प्रवेश पत्रावर सही आवश्यक
महाविद्यालयात प्रवेश पत्रा ची प्रिंट काढून दिल्यावर उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही शिक्का असणे आवश्यक आहे.
तसेच प्रवेश पत्रावर काही चूक किंवा अडचण असल्यास महाविद्यालयाने मंडळामार्फत दुरुस्ती करून घ्यायचे आहे. असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
परीक्षेपूर्वी प्रवेश पत्र हरवल्यास
परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले प्रवेश पत्र हरवल्यास महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची दुसरी प्रिंट उपलब्ध करून द्यावी आणि त्यावर डुप्लिकेट हा शेरा द्यावा अशा सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com