खूशखबर ! स्टेट बँकेत ८ हजार जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : बेरोजगाराची समस्येने चिंताग्रस्त असणाऱ्या तरुणाईसाठी खुशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत.

स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ जानेवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. याच कालावधीत अर्जदारांना नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे.