शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । शिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली. इतर माध्यमांसाठीची विनामुलाखतीशिवायची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत जाहीर केली जाणार आहे.

उर्दू माध्यमातील रिक्त पदासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका यांची व्यवस्थापननिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिंवर उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी सर्वसाधारण यादी पहावी. या यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी दि १०/०१/२०२० पर्यंत संबंधित संस्थेत उपस्थित राहून नियुक्ती प्राधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

शिक्षक भरतीची प्रक्रिया २८ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ५८२२ उमदेवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालली. त्यापैकी अनेकांनी नियुक्ती स्वीकारली. मात्र, दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. नवीन वर्षात भरतीचा पुढचा टप्पा मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थामध्ये निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]