नागपूर महानगरपालिकेत ६३ जागांची भरती

करिअरनामा । नागपूर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक पदांच्या एकूण ६३ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी  पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे. तरी या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत पाठवावेत.

पदांचा तपशील खालील प्रमाणे –  

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, राजस्व निरीक्षक, पब्लिक हेल्थ नर्स, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आशुलीपिक, रेखानुरेखक, वाहन चालक, कनिष्ठ लिपिक, मीटर रीडर/ मोहरीर/ कर संग्राहक, फायरमन, टेलिफोन ऑपरेटर/ पी/ बी/ एक्स ऑपरेटर, सहायक मेक्यॉनिक, शिक्षण सेवक

पद संख्या – ६३ जागा

फीस –रु. १५०

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज सुरु होण्याची तारीख – ३१ डिसेंबर २०१९ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर, स्थापना विभाग, १ ला माळा, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर, पिन – ४४०००१

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]