मोठ्या पॅकेजची नोकरी सोडली अन एक वर्षातच जिद्दीने झाली न्यायाधीश; यशोगाथा नक्की वाचा…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । सध्या देशात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसतात.  यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो.  मात्र काही विद्यार्थी हे कठोर परिश्रम घेऊन एक नवा आदर्श निर्माण करतात. अशाच एका तरुणीने मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाला गवसणी घातली आहे. या तरुणीनीला एका चांगल्या पॅकेजची नोकरी लागली होती. मात्र आपले ध्येय काही वेगळेच असल्याने या तरुणीने या नोकरीला लाथ मारली आणि जिद्दीने अभ्यास करून वर्षभरातच न्यायाधीश झाली.  हिना कौसर असे या तरुणीचे नाव आहे. हिना कौसर ही UP PCS-J 2019 परीक्षा उत्तीर्ण होऊन न्यायाधीश झाल्या आहे.

हिना ही झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील रहिवासी आहे.  तीच शालेय शिक्षण जमशेदपूर इथेच झाले. हिना यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. पदवी पूर्ण झाल्यानंतर तिने बंगळूरमधून एलएलएम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी क्लॅटची परीक्षा दिली. पदव्युत्तर करत असताना  तिने नोकरी देखील केली. त्यांनी तब्बल अडीच वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी केली आणि नोकरी करत अभ्यास देखील चालू ठेवला.

चांगली नोकरी होती. सगळं काही सुरळीत चालू होत. तसेच नोकरीमध्ये चांगल्या पॅकेजच्या ऑफर देखील येत होत्या. असे असूनही तिला  काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे चांगल्या पॅकेजच्या नोकरीवर देखील संतुष्ट नव्हत्या. याबाबत त्यांनी आपल्या आई वडिलांना सांगितले असता त्यांनी देखील सकारात्मक विचार करत “जर तू खुश नसेल तर काही वेगळं करायचं असेल तर प्रयत्न केले पाहिजे” असे सांगितले. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांना उभारी मिळाली आणि त्यांनी नोकरी सोडली. नंतर लगेचच त्यांनी न्यायपालिकेच्या परिक्षेची तयारी सुरू केली.

हिना यांनी पहिल्यांदा UP PCS-J ची परिक्षा दिली त्यात त्यांना अपयश आले पण त्या खचून न जात पुन्हा जोमाने तयारीस लागल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर UP PCS-J 2019 ची परीक्षा एका वर्षातच पास होऊन मोठं यश मिळवलं. त्यांची 2018 च्या बिहार, झारखंड, राजस्थान न्यायपालिकेच्या पात्रतेच्या परीक्षेमध्ये निवड करण्यात आली.