करिअरनामा । ग्रामीण भागात सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर सेवा देण्यास फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे वैद्यकीय सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांच्या सेवेवर रिक्त पदांमुळे ताण पडू लागला आहे. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध रुग्णालयांमध्ये परिचारिकांची तब्बल २ हजार ८७५ पदांची भरती प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व संवर्गातील परिचारिकांची एकूण २४ हजार ८१३ पदे मंजूर असून २१ हजार ९३८ पदे भरलेली आहेत, तर २ हजार ८७५ पदे रिक्त आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागांतर्गत एकूण ११ हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी ९ हजार ८४० पदे भरलेली आहेत, तर १ हजार ३४१ पदे रिक्त आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान ‘इंडियन नर्सिग कौन्सिल’ने शहरामध्ये तीन रुग्णांमागे एक परिचारिका आणि ग्रामीण भागात चार रुग्णांसाठी एक असे प्रमाण निश्चित केले आहे, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. काही ठिकाणी तर एका परिचारिकेला एकावेळी २५ ते ३० रुग्णांची सेवा करावी लागते. प्रत्येक तीन रुग्णांमागे एक परिचारिका हे प्रमाण महाराष्ट्र परिचर्या परिषदेनेही मान्य केले आहे. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयांमधील खाटा आणि जमिनीवर ठेवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता हे प्रमाण काही ठिकाणी ४० रुग्ण आणि एक परिचारिका यापेक्षाही जास्त होते, असे एका संशोधनातून आढळून आले आहे.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.