करिअरनामा । एलआयसी भरती प्रक्रिया ही अखेर मराठीतच होणार आहे. मराठीमध्ये परीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी LIC ने हे स्पष्टीकरण दिले आहे. मराठीवर कोणताही अन्याय होणार नसून उमेदवाराची निवड झाली तरी त्यांना स्थानिक भाषेची म्हणजेच मराठीची परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागेल.त्यानंतरच त्या उमेदवाराला नोकरीत रुजू केले जाईल, असे एलआयसीने स्पष्ट केले आहे.
देशभरातील विविध भागांमध्ये एलआयसीची भरती प्रक्रिया सुरू आहे. या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेतून मराठी विषय वगळल्याचा आणि हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली होते. त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समितीने 17 सप्टेंबर 2019 रोजी एलआयसी महामंडळाच्या वरिष्ठांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला होता. त्यावेळी आयुर्विमा महामंडळाने ऑनलाईन दोन परीक्षेनंतर उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 गुणांचा मराठी पेपर अनिवार्य करण्याचे कबूल होते.
तसेच यासंदर्भात 19 सप्टेंबर रोजी सुधारित परिपत्रक काढून महामंडळाने सर्वांना सूचित केले होते. त्यानंतरच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाधिकारतर्फे उमेदवारांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र तरी देखील गेल्या काही दिवसांपासून परीक्षार्थींची दिशाभूल करण्याचा खोडसाळ प्रयत्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी महेश लाड, शरद एक्के, श्याम पांचाळ, वृषाली मांजरेकर यांनी महामंडळाच्या अधिऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला आणि त्यानंतर विचारविनिमय करून LIC ची परीक्षा मराठीतच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.