करिअरनामा । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. रंगशारदा वांद्रे येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत खालील घोषणा करण्यात आल्या-
१] नोकरभरतीत राज्यातील स्थानिक तरुणांना 80 टक्के आरक्षण
२] बेरोजगारी संपवण्यासाठी राज्य सरकारमधील रिक्त पदांची तातडीने भरती
३] सुधारित पीकविमा योजनांद्वारे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई
४] शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, अवकाळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत
५] शिवतीर्थावर शपथविधीनंतर उद्धव ठाकरे सह्याद्री गेस्टहाऊसवर मंत्रिमंडळाची बैठक घेणार – जयंत पाटील यांची माहिती
६] जे लोकांच्या हिताचं, ते सरकार करणार! – एकनाथ शिंदे यांची माहिती
७] शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला – एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
८] समाजातील सर्व घटकांना पुढे घेऊन जाणार – एकनाथ शिंदे
९] शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार – एकनाथ शिंदे
१०] पूर, अवकाळग्रस्तांना मदत करणार – एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
११] शेतकरी, सर्वसामान्य माणसाचे हित जपणारे सरकार असणार आहे – एकनाथ शिंदे यांचा विश्वास
१२] राज्यातील जनतेच्या हितासाठी आघाडी कार्य करेल – एकनाथ शिंदे
१३] महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान-समान कार्यक्रम तयार
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.