करीअरनामा । लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) पिनाकी चंद्र घोस यांनी भ्रष्टाचारविरोधी स्थापन झालेल्या लोकपालचा नवीन लोगो व बोधवाक्याचे अनावरण केले. “मा गृधः कस्यस्विद्धनम” (कोणाच्याही संपत्तीबद्दल लोभ धरू नका)” असे बोधवाक्य यासाठी निवडन्यात आले. लोगो आणि बोधवाक्यांच्या प्रविष्ठांना आमंत्रित करणारी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती.
या स्पर्धेतून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी प्रशांत मिश्रा यांनी डिझाइन केलेला लोगो अखेर निवडला गेला. कायद्यानुसार न्याय प्रस्थापित करून लोकपाल भारतीय लोकांचे संरक्षण व काळजी कसे घेतात याचे प्रतीक लोगो आहेत.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर्स 2013-2019
लोकपाल एक भ्रष्टाचारविरोधी प्राधिकरण आहे जो भारतीय प्रजासत्ताकाच्या हिताचे प्रतिनिधित्व करतो.
लोकपालचे अध्यक्ष- न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) पिनाकी चंद्र घोस
लोकपालचे मुख्यालय: नवी दिल्ली
लोकपाल वेबसाईट- www.lokpal.gov.in
Logo????