करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) GRADE-B Officer या पदाच्या शेकडो रिक्त जागांवर भरती सुरू केली आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर, पदवीधारक असे दोन्ही प्रकारचे उमेदवार या पदांसाठी पात्र असतील. RBI GRADE-B पदाचा तपशील, नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जांची लिंक सविस्तर माहिती देण्यात आली आहे. RBI Recruitment 2021
पदांचा सविस्तर तपशील-
१. ऑफिसर ग्रेड-बी (General) – २७० पदे
२. ऑफिसर ग्रेड-बी (DEPR) – २९ पदे
३. ऑफिसर ग्रेड-बी (DSIM) – २३ पदे
पात्रता –
१. आरबीआय ऑफिसर ग्रेड-बी (General) साठी कोणत्याही विषयात किमान ६० टक्क्यांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. SC, ST दिव्यांगांसाठी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. किंवा कोणत्याही विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. RBI Recruitment 2021
२. ऑफिसर ग्रेड बी (DEPR/DSIM) साठी – संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्री किंवा पीजीडीएम (Post Graduate Diploma) केलेला असावा.
वयाची अट-
किमान- २१ वर्षे आणि कमाल-३० वर्षे
MPhil, Ph.D. उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान-३२ वर्षे , कमाल-३४ वर्षे.
आरक्षित वर्ग वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.
अर्ज असा करा –
रिझर्व्ह बँकेच्या या भरतीसाठी आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी २०२१ आहे.
निवड प्रक्रिया-
पदांचा भरतीसाठी ३ टप्प्यात परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. RBI Recruitment 2021
परीक्षांच्या तारखा-
ऑफिसर ग्रेड-बी (General)- पहिला टप्पा- ६ मार्च २०२१, दुसरा टप्पा- १ एप्रिल २०२१
ऑफिसर ग्रेड बी (DEPR/DSIM) पहिला टप्पा- ६ मार्च २०२१. दुसरा टप्पा- ३१ मार्च २०२१.
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.rbi.org.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल(@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com