करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक वर्ष 2020 मध्ये विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत टॉपर आलेल्या विध्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वी परीक्षेत टॉपर आलेल्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. मंगळवार २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात या विध्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.
विध्यार्थ्यांना पीएम बॉक्समध्ये बसून राजपथावर होणारे परेड पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचीही भेट, आणि सवांद साधता येणार आहे. तर शिक्षणमंत्री या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुकाचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. शिक्षण मंत्रालयाने या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
गेल्यावर्षी सहाशे जण यात सहभागी झाले होते. यावर्षी ही संख्या 401 पर्यंत सहभाग होणार आहेत. तसेच या परेडमध्ये दिल्लीचे चार शाळांमधील विद्यार्थी सामील होणार आहेत. दिल्लीमधील चार शाळांमध्ये एकूण 321 विद्यार्थी आणि कलकत्ता मधील ८० कलाकार राजपथावरील परेडच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने यात दिली आहे. कोलकत्तामध्ये ईस्टर्न जोनल कल्चर सेंटरने कलाकारांची निवड केली आहे. तसेच डीटीईए सीनियर सेकंडरी स्कूल, माउंट अबू पब्लिक स्कूल, विद्या भारतीय स्कूल आणि गव्हर्मेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूलमधील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com