CISF/CRPF Recruitment 2021। 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यात मोठया प्रमाणात नोकरीची संधी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (CRPF) हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. जीडी कॉन्स्टेबल पदासाठी होणारी ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून (SSC) केली जाईल.या भरतीची अधिसूचना  15 मार्चला निघेल. CISF/CRPF Recruitment 2021

SSC ने जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 2019 मध्ये 55 हजार पदांसाठी भरती केली होती. याशिवाय CRPF आणि CISF च्या माध्यमातून जवळपास 4000 पदांवर नियुक्ती केली होती. यावर्षी देखील कॉन्स्टेबल पदासाठी सीआरपीएफ आणि सीआयएसएफसाठी इतक्याच पदांची भरती होईल अशी शक्यता आहे.CISF/CRPF Recruitment 2021

SSC जीडी कॉन्स्टेबल अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, इंडो तिबेटन सीमा पोलीस, सशस्त्र सीमा दल, स्पेशल सुरक्षा दल, नॅशनल इन्व्हेस्टीगेशन एजेन्सी, आसाम रायफलसह अन्य दलांमध्ये भरती होईल. या भरतीबाबतची अधिक माहिती  https://ssc.nic.in/ या अधिकृत वेबसाईट उपलब्ध होईल. CISF/CRPF Recruitment 2021

 पात्रता – या पदांच्या भरतीसाठी अर्जदार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 18 वर्षे ते 23 वर्षे असणं आवश्यक आहे.

अर्ज असा करावा – 

1. अर्ज करण्यासाठी संबधित व्यक्तीला पहिल्यांदा भरतीसाठीची अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in/ येथे जावं लागेल.

2. या वेबसाईटवर सर्वात वरती हिरव्या रंगाच्या टॅबमध्ये Apply हा टॅब आहे तेथे क्लिक करा.

3. या ठिकाणी SSC जीडी कॉन्स्टेबल भरतीचा फॉर्म निवडून भरा.

4. फॉर्म भरल्यानंतर त्याचं शुल्क देखील भरायचं आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial)करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com