करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पोस्ट खात्याने ग्रामीण डाक सेवकाच्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे. नव्या नोटिफिकेशनुसार गुजरात आणि कर्नाटक पोस्ट सर्कलमधील 4269 पदांसाठी 23 जानेवरीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी 20 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. अर्ज करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. India Post GDS 2021
ग्रामीण डाक सेवक पदासाठी 10 वी पर्यंत शिक्षण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. भारतीय डाक विभागाच्या appost.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खुल्या आणि ओबीसी वर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहेत. तर एससी आणि एसटी वर्गातील महिला उमेदवारांना नि:शुल्क अर्ज करता येणार आहे. ग्रामीण डाक सेवक पदासाठी कर्नाटकमध्ये 2443तर गुजरातमध्ये 1826 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. India Post GDS 2021
अर्ज करताना हे लक्षात घ्या –
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. ऑनलाईन जमा अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून निवड केली जाईल. ही निवड करताना केवळ इयत्ता 10वीच्या गुणांचाच विचार केला जाणार आहे. उच्च शिक्षितांना या भरतीचा कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नाही. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं, असं डाक विभागाने स्पष्ट केलं आहे. India Post GDS 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – GDS
पदसंख्या –
गुजरात पोस्टल सर्कल – 1826 जागा
कर्नाटक पोस्टल सर्कल – 2443 जागा
पात्रता – दहावी उत्तीर्ण
वयाची अट – वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे
शुल्क – खुला वर्ग – 100 रुपये , राखीव वर्ग – शुल्क नाही.
निवड प्रक्रिया – टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 जानेवारी 2021
अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com