नीती आयोगांतर्गत इंजिनिअर असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी ; ६० हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।नीती आयोगांतर्गत विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विविध पदांसाठी पात्र असणाऱ्यांना उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२१ आहे.अधिक माहितीसाठी   http://www.niti.gov.in/ ही वेबसाईट बघावी.

उमेदवारांची निवड २ वर्षाच्या करार पद्धतीनुसार होणार आहे. इंजिनिअरिंगची पदवी असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंजिनिअरिंगची पदवी असणाऱ्यांना नीती आयोगांतर्गत यंग प्रोफेशनल्स पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

उमेदवारांची निवड २ वर्षाच्या करार पद्धतीनुसार असेल. उमेदवारांनी २४ जानेवारीपर्यंत  नीती आयोगाच्या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. या पदासाठी इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा पास असणे आवश्यक आहे. या पदासाठी १० रिक्त जागा आहेत. उमेदवाराचे वय ३२ वर्षापेक्षा जास्त नसावे. पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. वेतन ६० हजार रुपये आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखत आशा दोन प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड होणार आहे. नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.niti.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com