मोठी बातमी! राज्यात 8,500 जागांसाठी मोठी नोकर भरती; आरोग्यमंत्र्यांची माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई । कोरोना काळात आरोग्य विभागावर मोठा ताण आला होता. अनेक ठिकाणी अगोदरच्या रिक्त जागा न भरल्या गेल्याने शासकीय आरोग्य व्यवस्थेला कोरोना काळात मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. यामुळे आगामी काळात आरोग्य विभागात १७ हजार जागांची मोठी भरती काढणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८,५०० पदांसाठी भरती जाहीर होणार असल्याची माहिती टोपे यांनी आज दिली आहे. Arogya Vibhag Bharti 2021

५० विविध पदे आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत याबाबत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. कंत्राटी पदांमध्येही काही बदल करायचे आहेत. याबाबतचा एक प्रस्तावही आपण राज्यपालांना दिला आहे. उद्या ८ हजार ५०० पदांसाठी जाहिरात निघेल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. एका रुग्णालयाच्या खाजगी कार्यक्रमात बोलताना टोपे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

उद्या (१८ जानेवारी) नोकर भरतीची पहिली जाहिरात निघणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं कामही पूर्ण होईल. या नोकर भरतीवेळी कोरोना काळात कंत्राटी काम केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार नाही. मात्र कोरोना संकट काळात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने काम केले. त्यांना नियमित नोकरीवर घेणे शक्य नसल्याने आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाप्रमाणे तसे करणे नियमबाह्य ठरणार आहे. तरीही त्यांना वेगवेगळ्या भरती तसेच राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM) मधील पदांची भरती करताना प्राधान्य दिले जाणार आहे. Arogya Vibhag Bharti 2021

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे.

करिअर आणि नोकरी विषयक सर्व अपडेट थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुपला Join व्हा. Click Here क्लिक करा