सुवर्णसंधी ! लवकरच HCL कंपनीमध्ये 20 हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याही (HCL Technology) महसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार आहे.

HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ-

मागील तिमाहीत एचसीएल टेक्नॉलॉजीच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. या कंपनीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने सांगितल्यानुसार हा नफा 3982 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलात 6.4 टक्क्यांनी वाढ झाली असून हा महसूल 19302 कोटी रुपये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर येत्या काळात या कंपनीकडून 20 हजार नवे रोजगार दिले जातील, असं एका अधिकाऱ्यांने सांगितलं आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय कुमार यांनी याविषयी सविस्तर माहिती देताना म्हणाले, “मागील काही महिन्यांमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. तसेच, लोकांचे डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन HCL Technology आगामी काळात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीत 1,59,682 कर्मचारी कामावर होते. मागील तिमाहीमध्ये आम्ही एकून 12,422 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात अनेकांनी राजीनामे दिले. त्यामुळे पुढच्या 4 ते 6 महिन्यांत 20 हजार जणांना काम देणार आहेत.” तसेच कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तसेच अनुभवी लोकांची निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 26.7 टक्के नफा – 

लॉकडाऊन असल्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. मात्र आता सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे HCL Technology कंपनीच्या नफ्यामध्ये सुद्धा चांगली वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात HCL Technology या कपंनीला 26.7 टक्के जास्त फायदा झाल्याचं या कंपनीने सांगितलं आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com