करिअरनामा ऑनलाईन । एलायंस एअर एव्हिएशन लिमिटेडमध्ये मॅनेजर, सुपरव्हायझरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नोकरीच्या खास संधी दिल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास बाब म्हणजे नोकरीसाठी उमेदवाराला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. पण तरीदेखील यामध्ये निवडले जाणारे उमेदवार हे एअर इंडियामध्ये नोकरी करणार आहेत. यासाठी 15 जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारिख आहे. Air India Recruitment 2021
भरतीसाठी ग्राऊंड इंस्ट्रक्टरपासून ते सीनिअर सुपरव्हायझरपर्यंत जागा भरण्यात येणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. त्याजागी वॉक-इन-इंटरव्ह्यू घेतला जाईल. याच माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाईल. वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी 15, 16 आणि 21 जानेवारी या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. तर उमेदवार 15 जानेवारीच्या आधी Air India च्या अधिकृत वेबसाईट airindia.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. Air India Recruitment 2021
या नोकरीअंतर्गत चीफ ग्राऊंड इंस्ट्रक्टसाठी 1, इंजिनिअरिंग चीफसाठी 1, रेव्हन्यू मॅनेजमेंट चीफसाठी 1, व्हाईस जनरल मॅनजरसाठी 1, एजीएम 1, एजीएमच्या SMS साठी 1 पद, एजीएम QMS 1, सीनिअर मॅनेजर (ट्रेड सेल्स) 1, कंपनी सेक्रेटरी 1 पद, मॅनेजर (ट्रेड सेल्स) साठी 2 पदं, फायनेंशिअल मॅनेजर पदावर 1 उमेदवार अशी निवड करण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त मार्केटिंग सेक्टरमध्ये 1 पद, ऑपरेशन 2 पद, ट्रेनिंग 2, आयएफएससाठी 1 पद, फायनेंस 5 पदं आणि सुपरव्हायझर (IT) साठी 1 पदावर भरती होणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त पोस्टसाठी उमेदवारांकडे MBA, पोस्ट ग्रॅजुएशन आणि पीजी डिप्लोमाची डिग्री असणं महत्त्वाचं आहे.
अधिकृत वेबसाईट – Click Here
पहा जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com