एक वर्षाचा LLM अभ्यासक्रम होणार बंद ; PG साठी नवी प्रवेश परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।बार काउन्सिल ऑफ इंडियाने एक वर्ष कालावधीचा मास्टर डिग्री प्रोग्राम कोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम रद्द करण्यात येईल. कोणत्याही विधी विद्यापीठाला हा अभ्यासक्रम चालवण्याची मुभा नसेल.

हा अभ्यासक्रम २०१३ रोजी सुरू करण्यात आला होता. यापुढे एलएलएम पदवी ही दोन वर्षांचा चार सत्रांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरच बहाल करण्यात येईल. बार काउन्सिलने पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नव्या प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव ठेवला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट इन लॉ (PGCETL) असे या परीक्षेचे नाव असेल. बार काउन्सिल ऑफ इंडिया लीगल एज्युकेशन (पोस्ट ग्रेजुएट, डॉक्टोरल, एक्झिक्युटिव, वोकेशनल, क्लिनिकल अँड अदर कंटीन्यूइंग एज्युकेशन) नियम २०२० या २ जानेवारी रोजी सूचित करण्यात आले. त्यानुसार हे बदल करण्याचे प्रस्तावित आहे.

जाणून घ्या , नवीन नियम  – 

विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे २०१३ मध्ये सुरू केलेला एक वर्ष कालावधीचा लॉ मास्टर डिग्री प्रोग्राम या चालू वर्षाच्या शैक्षणिक सत्रापर्यंतच कार्यरत आणि मान्य असेल.

नवा पोस्ट ग्रॅज्युएट लॉ मधील मास्टर डिग्री एलएलएम अभ्यासक्रम चार सेमिस्टरचा, दोन वर्षे कालावधीचा असेल.

बार काउन्सिल ऑफ इंडिया दरवर्षी सर्व विद्यापीठांमध्ये लॉमधील मास्टर डिग्री कोर्सच्या प्रवेशासाठी पीजीसीईटीएल आयोजित करू शकते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसारच विद्यार्थ्यांचे प्रवेश करणे बंधनकारक आहे.

कोणतेही विद्यापीठ कोणाही व्यक्तीला कोणत्याही विषयात किंवा क्षेत्रात पदवीची डिग्री (LLM) प्रदान करणार नाही.

BA. LL.B. किंवा BBA.LL.B किंवा B.Sc. LL.B. या सर्व पदवी किमान पाच वर्षांच्या कालावधीच्या शिक्षणानंतरच देण्यात येईल.

परदेशी विद्यापीठातून समकक्ष एलएलबीशिवाय मिळवलेली एलएलएम पदवी, भारतीय एलएलएम डिग्रीशी समकक्ष असणार नाही.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com