पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनाम ऑनलाईन । पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. टेक्निशिअन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर आदी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. एकूण 139 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणेद्वारे (Maharashtra Metro Rail Corporation Pune) हे अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता
1)टेक्निशिअनसाठी ITI (NCVT / SCVT).
2)स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटरसाठी – 3 वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मान्यताप्राप्त विद्यापीठ.
3)सेक्शन इंजिनिअर – 4 वर्षे इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण.
4)ज्युनिअर इंजिनिअर – 3 वर्षांचा इंजिनिअर डिप्लोमा

परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव वर्गासाठी 150 रुपये फी आकारण्यात येणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा कराल?
नोटिफिकेशन पाहण्यासाठी, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा…

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा …