सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार देतंय मोफत लॅपटॉप ? जाणून घ्या सत्य

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।सर्व विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मोफत लॅपटॉप देत आहे, असा एक मेसेज व्हायरल झाला आहे. जर तुम्हाला असा प्रकारचा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा. या मेसेजसोबत एक लिंक देखील आहे. सरकारने पीआयबीच्या (PIB Fact Check) माध्यमातून ट्विट करून यासंदर्भात केंद्राची अशी कोणतीही योजना कार्यान्वित नसून ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ऑफिशियल ट्विटरवर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप देत असल्याचा दावा मेसेजमध्ये केला आहे. याव्यतिरिक्त एक लिंक देखील दिलेली आहे.मात्र, ही लिंक फेक असून सरकार अशी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवत नसल्याचे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे.

 फॅक्ट चेक करू शकता
जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असल्यास तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर 918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

ईमेल – pibfactcheck@gmail.com

फॅक्ट चेकसाठी –  https://factcheck.pib.gov.in/

अधिकृत वेबसाईट – https://pib.gov.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com