करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य सीईटी कक्षाने तीन वर्षे आणि पाच वर्षे कालावधीच्या विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जारी केले आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर mahacet.org लॉ च्या कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार, तीन वर्षे कालावधीच्या एलएलबी प्रवेशांसाठी १८ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन काउन्सेलिंग आणि प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत आहे. ३ वर्षे कालावधीच्या एलएलबी प्रवेशांची पहिली अलॉटमेंट यादी ४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ नंतर जाहीर केली जाणार आहे.
पाच वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पहिली अलॉटमेंट यादी ३१ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी पाच वाजल्यानंतर जाहीर होणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत काऊन्सेलिंग आणि कागदपत्र सादर करण्याचा अवधी आहे.
तीन वर्षे एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे वेळापत्रक – https://bit.ly/2K2DM1j
पाच वर्षे एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांचे वेळापत्रक – https://bit.ly/2Wce9xv
अधिकृत वेबसाईट – http://mahacet.org
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com