करिअरनामा ऑनलाईन ।सैन्यभरती कार्यालय बेळगावकडून शिपाई (जेडी) यासह विविध ट्रेड भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले आहेत. सैन्य भरती कार्यालय बेळगावच्या वतीने 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2021 या कालावधीत ही भरती मेळावा आयोजित केला जाईल. सैन्यभरती मध्ये कॉन्स्टेबलसाठी किमान अर्जाची अर्हता दहावी /हायस्कूल पास असून त्यामध्ये 45 टक्के गुण आवश्यक आहेत.
ARO Belgaum Army Recruitment Rally Bharti 2020
सैन्य भरती रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी उमेदवारांनी आधी http://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती मिळवा वर जाऊन भरती अर्जासाठी दिलेल्या सूचना वाचून त्यांची नोंदणी करावी लागेल.कारण भरती मेळाव्यात भाग घेण्यासाठी केवळ त्या उमेदवारांना मैदानात प्रवेश मिळेल, ज्यांना लष्कराकडून प्रवेशपत्र मिळालेलं असेल. म्हणजेच प्रवेशपत्र पाहूनच प्रवेश प्राप्त होईल. सैन्य भरती सूचनेनुसार, भरतीची तारीख व ठिकाण याची माहिती नंतर दिली जाईल.
सविस्तर तपशील –
पदाचे नाव – शिपाई (जीडी) ARO Belgaum Army Recruitment Rally Bharti 2020
शैक्षणिक पात्रता –
दहावीच्या परिक्षेत किमान 45 टक्के गुण आणि प्रत्येक विषयात 33 टक्के गुणांसह दहावीत परीक्षा उत्तीर्ण
ग्रेडिंगचा निकाल लागला असेल तर उमेदवार सी 2 ग्रेड किंवा प्रत्येक विषयात डी ग्रेडसह पास होणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता –
उंची – 166 सेमी
छाती – 77 सेमी, 5 सेमी फुगवून
वयाची अट – 17.5 ते 21 वर्षे (अर्जदार जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान)
अर्ज करण्याची मुदत – 5 डिसेंबर 2020 ते 18 जानेवारी 2021 दरम्यान
नोंदणी करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com