करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल जाहीर झाला आहे. त्यात सहायक प्राध्यापक पदासाठी ४० हजार ९८६ आणि कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी ६ हजार १७१ असे एकू ण ४७ हजार १५७ उमेदवार पात्र ठरले आहेत.
करोना संसर्गामुळे जूनमध्ये होणारी परीक्षा यंदा २४ सप्टेंबर ते १३ नोव्हेंबरदरम्यान बारा दिवसांमध्ये देशभरातील २२५ शहरांतील १ हजार ११९ केंद्रांवर घेण्यात आली.परीक्षेसाठी एकूण ८ लाख ६० हजार ९७६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख २६ हजार ७०७ उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यात सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी केलेल्या २ लाख ५९ हजार ७३४ उमेदवारांपैकी १ लाख ४० हजार ४७९ उमेदवारांनी, तर कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी नोंदणी के लेल्या ६ लाख १ हजार २४२ उमेदवारांपैकी ३ लाख ८६ हजार २२८ उमेदवारांनी परीक्षा दिली.
कनिष्ठ संशोधक पाठय़वृत्ती, सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज के लेल्या आणि सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरलेल्या ३६ हजार १३८ उमेदवारांपैकी ४ हजार २९ उमेदवारांची एनएफएससी पाठय़वृत्तीसाठी, ४३१ उमेदवारांची एनएफओबीसी पाठय़वृत्तीसाठी आणि ४७५ उमेदवारांची एमएएनएफ पाठय़वृत्तीसाठी निवड झाली असल्याचे एनटीएने प्रसिद्धिपत्रकाद्वारे नमूद के ले आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com