UGC NET July 2020 Results Announced: यूजीसी नेट 2020 परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

नवी दिल्ली । यूजीसी नेट निकाल 2020 जाहीर झाला आहे. या परीक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे. एनटीएने 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 ची परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी नोंदणीकृत 8,60,976 उमेदवारांपैकी केवळ 5,26,707 परीक्षार्थीच उपस्थित राहिले. (UGC NET July 2020 Results Announced)

यावेळी नेट परीक्षा (सीबीटी) संगणक पद्धतीने घेण्यात आली आहे. यात 12 दिवसांमध्ये 81 परीक्षा घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या. यावेळी एनटीएने ही परीक्षा संगणक आधारित ठेवली होती. सर्व प्रमुख विषयांसाठी अंतिम कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. आपण अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर जाऊन आपली कटऑफ देखील तपासू शकता.