करिअरनामा ऑनलाईन । येत्या सोमवारपासून (23 नोव्हेंबर) राज्यातील (Maharashtra) नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पण, शाळा सुरू करणे बंधनकारक नाही, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केली आहे.
राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे, हे ठरवून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असंही बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करताय तर या गोष्टी लक्षात ठेवाच..