करिअरनामा ऑनलाईन । फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाने औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी.फार्म )अभ्यासक्रमात बदल केला आहे. तब्बल तीस वर्षानंतर पदविका अभ्यासक्रमात बद्दल करण्यात आला असून,नव्या अभ्यासक्रमात रोजगारनिर्मिती कौशल्य,प्रात्यक्षिक कौशल्य यावर भर देतानाच रुग्णांना आजार,औषधांविषयी सल्ला आणि समुपदेशन करता येणार आहे.
फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाने पदविका अभ्यासक्रमात बद्दल करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.नव्या अभ्यासक्रमात नवीन औद्योगिक उपकरणे,औषधाचे मुल्याकंन,नवी औषध प्रणाली यांचा समावेश करण्यात आला आहे.
इन्सिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.जगताप म्हणाले, “अभ्यासक्रमातील बदलाचे स्वागत आहे.या अभ्यासक्रमामुळे औषधनिर्माणशास्त्र शिक्षणाचा दर्जा उंचावता येईल” तसेच पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य आत्माराम पवार म्हणले, गेल्या तीस वर्षात अभ्यासक्रम बदलण्यात आला नव्हता.अभ्यासक्रम बदलण्याची मागणी मान्य झाल्याने पदविका अभ्यासक्रमाला नवी दिशा मिळेल.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com