करिअरनामा ऑनलाईन ।सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाल लागेपर्यंत ११ ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील अनेक मराठा उमेदवारांनी सामाजिक आर्थिक आरक्षणांतर्गत अर्ज भरले आहेत.मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने या उमेदवारांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे तसेच ऑनलाईन याचिकाही दाखल केली आहे.
ऑनलाईन याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी स्पष्ट केले आहे की, “११ ऑक्टोबरला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा स्थगित करण्याचे कारण दिसून येत नाही.मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.शासनाकडून निर्देश प्राप्त होईपर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार नाही.”
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com