महाविद्यालयांची प्रश्नसंच नाही तर सराव प्रश्न देण्याची भूमिका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची सूचना कुलुगुरुना दिली असली तरी विद्यापीठे आणि कॉलेजेस विद्यार्थ्यांना केवळ सराव प्रश्न देण्याच्या तयारीत आहेत. कॉलेजांमध्ये प्रश्नसंच तयार होणार आहेत. मात्र, यातून प्रश्नपत्रिकांचे विविध सेट तयार होतील. विद्यार्थ्यांसाठी 50 ते 100 सराव प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिका कशा तयार कराव्यात, त्यांची काठीण्य पातळी कशी असावी तसेच अंतिम परीक्षेबाबत कार्यवाही कशी करावी याबाबत मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढले आहेत. यात समूह कॉलेजांच्या प्रमुख कॉलेजांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक कॉलेजला परीक्षेसाठी प्रश्नसंच तयार करण्याची सूचना आहे. हा प्रश्नसंच कॉलेजांमध्येच राहणार असून, यातून प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट तयार केले जाणार आहेत. त्यापैकी एक सेट विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

ही परीक्षा घेताना 13 मार्चपर्यंत शिकविलेल्या अभ्यासक्रमाचाच समावेश करण्यात करायचा आहे. परीक्षा मंडळाच्या बैठकीनंतर विद्यापीठाने परिपत्रक काढून कॉलेज, प्रमुख कॉलेज यांची जबाबदारी निश्चित केली असून, प्रश्नपत्रिका तयार करत असताना सोपे, सामान्य आणि अवघड अशा तीन टप्प्यात त्याची रचना करण्यात येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com