MPSC परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा 11 ऑक्टोबर, तर संयुक्त 22 नोव्हेंबर रोजी होणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

मुंबई प्रतिनिधी । राज्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत जात असून, परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसल्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

आज आयोगाने नवीन सुधारित पूर्व परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा  11 ऑक्टोंबर 2020 रोजी होणार तर संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षा 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोरोना विषाणू संसर्ग बघता आयोगाने पाचव्यांदा नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. सध्या नव्याने जाहीर केलेल्या तारखेला परीक्षा होतीलच, त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थी यांनी कसल्याही संभ्रम अवस्थेत  राहण्याची आवश्यकता नाही.