करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे पदव्युत्तरच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु करण्यात आले आहेत. कला आणि वाणिज्य पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 21 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा विभागामार्फत यंदाच्या शैक्षणिक वर्षात दूरशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये कला आणि वाणिज्य पदवी अभ्यासक्रमाचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31ऑगस्ट आहे, तर आता पदव्युत्तर पदवीचेही प्रवेश सुरु करण्यात आले आहेत.त्यासाठी विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशाळेच्या वेबसाईटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी संपूर्ण शिक्षण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे यावर्षी दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढण्याची शक्यता आहे.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com