CET परीक्षा न घेता बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवावी – झोळ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे  देशभरातील सात राज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET ) न घेता बारावीच्या गुणांवर शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही  हा निर्णय घेण्याची मागणी असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अनएडेड इन्सिट्यूट्स इन रूरल एरियाचे अध्यक्ष रामदास झोळ यांनी केली आहे.

अध्यक्ष रामदास झोळ म्हणाले, की राज्यात बारावीचा निकाल जाहीर होऊन महिन्याभरानंतरही अभियांत्रिकी, ओषधनिर्माण आशा व्यावसायिक अभ्रासक्रमाच्या प्रवेशसाठीच्या प्रवेश परीक्षेबाबत स्पष्टता नाही. विध्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याची भूमिका राज्यशासनाने  घेतली आहे, मात्र  CET बाबत स्पष्टता नसल्यामुळे  विद्यार्थी- पालक चिंतेत आहेत.

सात राज्यांनी प्रवेश परीक्षा रद्द करून बारावीच्या गुणांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे.त्यामुळे राज्यशासनानेही केवळ यावर्षी बारावीच्या गुणांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांला प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. CET बाबत अद्यापही चर्चाच सुरु असून,प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी- पालक चिंतेत आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com