इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर आणि ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर पदाच्या २१० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्पुटर सायन्स/ आयटी) अर्हताधारक असावा.
ज्युनिअर कंसल्टंट (ऑपरेशन) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – आयटीआय (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ रेडिओ & टीव्ही/ इलेक्ट्रिकल & फिटर) अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ३० वर्ष आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी २८ वर्षापेक्षा जास्त नसावे.( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – नाही.
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही.
थेट मुलाखत – ज्युनिअर टेक्निकल पदांसाठी ९ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३०वाजता) आणि ज्युनिअर कंसल्टंट पदांसाठी ८ नोव्हेंबर २०१८ रोजी (सकाळी ९:३० वाजता) घेण्यात येईल.
मुलाखतीचे ठिकाण – विभागीय कार्यालय, १२०७, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई. दूरध्वनी:- ०२२-४२२४२४९/ २४२२३४४३