जिद्दीची कहाणी !! ऑनलाईन शिक्षणासाठी दररोज चढायचा डोंगर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

राजस्थान मधील एका १३ वर्षाच्या मुलाची कहाणी क्रिकेटर सेहवाग यांनी आपल्या ट्विटर अकॉउंट वरून शेअर केली आहे. हरीश बाड़मेर असे या मुलाचे नाव आहे. तो राजस्थान मधील पचपदरा येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय मध्ये शिकत आहे. तो यावर्षी सातवी मध्ये आहे. लॉक डाउन सुरु झाल्यापासून तो त्याच्या गावी आलेला आहे. पण शासनाच्या निर्णयानंतर त्याची हि शाळा सुरु झाली. त्यानुसार त्याचे दररोज ऑनलाईन तास घेतले जात होते. परंतु ज्या गावात राहत आहे तेथे अजिबात शैक्षणिक सुविधा नाहीत. तसेच मोबाइलला नेटवर्क पण मिळत नव्हते मग त्याने डोंगरावर जाऊन क्लास अटेंड करायचा निर्णय घेतला कि ज्याणेंकरून तेथे तरी नेटवर्क येत . त्यानंतर मात्र त्याचा दररोज चा दिनक्रम होऊन गेला. तो दररोज क्लास साठी डोगर चढायचा आणि अभ्यास करूनच घरी यायचा. इतक्या संकटात तो मुलगा शिक्षणासाठी इतके कष्ट घेत आहे. त्याची जिद्ध आणि कसोटी पाहून खुद्ध वीरेंद्र सेहवाग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.त्याची अभ्यासाबाबत असलेले मेहनत, चिकाटी, आणि जिद्ध याच सर्वांकडून कौतुक होत आहे.

हरीश चे वडील वीरमदेव सांगतात कि, आज ग्रामीण भागात मुलांना शिक्षणाच्या कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. ऑनलाईन च्या जमान्यात ग्रामीण भागातील मुलं नेटवर्क च्या प्रॉब्लेम मुळे शिकू शकत नाहीत. त्यामुळे मुलांना शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. सरकार ने ग्रामीण भागातील मुलासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी काहीतरी उपाययोजना करायला हव्यात . त्यामुळे कदाचित ग्रामीण भागातील एकही मुलाचे शिक्षण मधूनच बंद होणार नाही. शहरात मुलांच्याकडे सर्व सोयी सुविधा लगेच उपलब्ध होतात. पण त्याउलट ग्रामीण भागातील मुलाचे आहे. त्यामुळे शासनाने त्याकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com