‘IISER’ ला संशोधनासाठी राज्य शासनाकडून मान्यता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोविड १९ ) संसर्गामुळे राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन प्रकल्पावर परिणाम होऊन संशोधन कार्य थांबले होते. त्यामुळे  आयसरचे संचालक प्रा. जयंत उदगावकर यांनी राज्य शासनाकडे संशोधन सुरु करण्यासाठीची परवानगी देण्याची मागणी केली होती. ही मागणी राज्यशासनाने मान्य केली आहे .

कोरोना विषाणू संसर्गामुळे आयसरमधील विद्यार्थी घरी निघून गेल्यामुळे  संशोधन कार्य थांबले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी करून संशोधन प्रकल्प सुरु करण्यासाठी आयसरकडून आपापल्या गावी असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेत बोलवण्याचे  नियोजन करण्यात येत आहे. असे आयसरच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ.संजीव गलांडे यांनी सांगितले.

सध्या आयसरमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत. त्यातील सुमारे चाळीस विद्यार्थी कोरोना चाचण्या आणि संशोधनासाठी स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. आता बाकी संशोधन प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयन्त सुरु केले जातील,असेही डॉ.गलांडे यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com