‘या’ तरुणीने घेतली देशातील दुसर्‍या सर्वांत श्रीमंत व्यक्तीची जागा; HCL कंपनीची झाली चेअरमन

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात जगातील प्रख्यात कंपनी HCL Technologies मध्ये मोठा बदल झाला आहे. कंपनीने शुक्रवारी शिव नाडर यांनी चेअरमन पद सोडले असल्याची माहिती दिली आहे. आता त्यांची दुसरी पिढी कंपनीच्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे. त्यांची मुलगी रोशनी नाडर मल्होत्रा यांना त्यांच्या प्रभावामुळे चेअरमन पद देण्यात आले आहे. शिव रोशनी यांचे लग्न झाले असून त्यांच्या पतीचे नाव शिखर मल्होत्रा आहे. ते एचसीएल  फाउंडेशनच्या कामात पत्नीला मदत करतात. या दोघांना एक मुलगा देखील आहे.

रोशनी यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली मध्ये झाले आहे. २०१० मध्ये त्यांना कंपनीचे एक्सझिक्युटीव्ह डायरेक्टर बनविले गेले होते. कोरोना महामारीमुळे एचसीएलला मोठा फायदा झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-जून या काळात कंपनीने आपल्या ऑपरेशनने रिव्हेन्यू मध्ये ४.०१ टक्के वाढ केली आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की  शिव नाडर नेटवर्थमध्ये मुकेश अंबानींनंतर देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना एकुलती एक मुलगी रोशनी आहे. त्या आता जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या पहिल्या शंभर मध्ये आल्या आहेत. २००९ मध्ये त्यांना सीईओ बनविण्यात आले होते. तेव्हा त्यांचे वय २७ वर्षे होते.

त्यांनी नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात मीडियामध्ये पदवी घेतली आहे. सीएनबीसी चॅनेल मध्ये त्यांनी इंटर्नशिप देखील केली आहे. नंतर लंडनमधील स्काय न्यूज ऑफिसमध्ये काम देखील केले आहे. त्यांनी नंतर केल्लोग ग्रैजुएट स्कूल ऑफ मैनेजमेंट मधून सोशल इंटरप्राइज मैनेजमेंट एंड स्ट्रेटजी मध्ये एमबीए केले आहे. २००८ मध्ये त्यांनी एचसीएल मध्ये पुरागमन केले. टेक्नोलॉजी, हेल्थकेयर आणि इन्फोसिस्टमसाठी काम करणाऱ्या एचसीएलचा २०२० पर्यंतचा रिव्हेन्यू  जवळपास ९.९३ बिलियन डॉलर इतका आहे. रोशनी कंपनी मध्ये  सारे स्ट्रैटजिक निर्णय घेतात.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com