जुलैमध्ये घेतली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा रद्द

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना विषाणू (कोव्हीड 19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन इन्सिट्यूट ऑफ चार्टड अकौटंटस ऑफ इंडियातर्फे जुलैमध्ये  घेतली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा अखेर रद्द करण्यात आली.

सनदी लेखापाल (सीए) परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. त्यानुसार मेमधील परीक्षेचे वेळापत्रक संस्थेने जाहीर केले होते.  मात्र, सध्याच्या कोरोना परिस्थतीमुळे वेळापत्रकात बद्दल करण्यात आला होता. त्यानुसार ही परीक्षा 29 जुलै ते 16 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. मात्र, या वेळापत्रकास ही  पालकांचा  विरोध होता.

सनदी लेखापाल परीक्षा वेळापत्रकाच्या  विरोधात पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने विचारणा केल्यावर सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणे कठीण असल्याचे मान्य करून जुलैमध्ये घेतली जाणारी परीक्षा अखेर रद्द करण्यात आली. या परीक्षेस अर्ज केलेल्या विध्यार्थ्यांना आता नोव्हेंबरच्या परीक्षेस बसता येणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com