करिअरनामा आॅनलाईन : Swachhta Saarthi Fellowship 2022 हा भारत सरकारचा उपक्रम आहे. इयत्ता 9 वी ते 12वी आणि UG, PG आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जातो. कचरा व्यवस्थापन/ जागरूकता मोहिमा/ कचरा सर्वेक्षण या कामात सेवा देणाऱ्या नवोदित तरुणांना स्वच्छता सारथी म्हणून सक्षम करण्यासाठी भारत सरकार हा उपक्रम राबवते. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हा फेलोशिप देण्यामागील मुख्य हेतू आहे. हि फेलोशिप मिळवण्यासाठी दि. ४ मे पर्यंत अर्ज करायचे आहेत.
फेलोशिपसाठी पात्रता-
श्रेणी A – इयत्ता 9 वी ते 12 वीत शिकत असलेले विद्यार्थी
श्रेणी B – UG आणि PG विद्यार्थी
श्रेणी C : वैयक्तिक समुदाय कार्यकर्ता किंवा स्वयंसहाय्यता गट (SHGs)
(टीप- एका SHG द्वारे जास्तीत जास्त दोन अर्ज सादर केले जाऊ शकतात)
स्वच्छता सारथी फेलोशिपचे फायदे (Swachhta Saarthi Fellowship 2022) –
श्रेणी A : 1 वर्षाच्या कालावधीसाठी 500 रुपये प्रति महिना
श्रेणी B : 1 वर्षाच्या कालावधीसाठी 1,000 रुपये प्रति महिना
श्रेणी C: 1 वर्षाच्या कालावधीसाठी 2,000 रुपये प्रति महिना
स्वच्छता सारथी फेलोशिपचे इतर फायदे –
प्रत्येक श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फेलोला स्वच्छता सारथी म्हणून ओळखले जाईल. Swachhta Saarthi Fellowship 2022
वर्षाच्या अखेरीस 10 सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण प्रकल्प/उपक्रम/डेमो मॉडेल/प्रोटोटाइप/अहवालांना कार्यक्रमांतर्गत मान्यता मिळेल.
आवश्यक कागदपत्रे –
विद्यार्थी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र
फेलोशिपसाठी असा करा अर्ज –
१. “Apply Now” बटणावर क्लिक करा आणि तपशील वाचा.
२. ‘आता अर्ज करा’ बटणावर Navigate करा.
३. अर्ज फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी श्रेणी निवडा.
४. आवश्यक तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
अधिकृत वेबसाईट : https://www.wastetowealth.gov.in/fellowship-home
Apply Now : (click here)
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
दि. ४ मे २०२२, रात्री ११:५९ वाजेपर्यंत
निकालाची घोषणा – दि. ४ जून २०२२ दुपारी २:०० वाजता
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com