शिक्षिकेने वर्गात विद्यार्थिनीसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून आमिर खान आठवेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा आॅनलाईन : दिल्लीच्या एका सरकारी शाळेत शिक्षिकेने विद्यार्थिनीसोबत वर्गातच ठेका धरला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. मनु गुलाटी असं या शिक्षिकेचं नाव आहे. त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवतात. गुलाटी मॅडमनी विद्यार्थिनीसोबत ठेका धरून वर्गातील मुलांचे मनोरंजन केले. हा व्हिडीओ सोशल मिडियावर पाहिल्यानंतर लोकांना ‘तारे जमी पर’ या चित्रपटातील आमिर खानची व्यक्तिरेखा आठवली.

शाळेतील वर्ग कधीकधी विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होतात. परंतु असे अनेक शिक्षक आहेत जे त्यांचे वर्ग मजेशीर आणि आनंददायी बनवण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. त्याचाच प्रत्यय आला दिल्लीच्या या सरकारी शाळेत.

मनु गुलाटी यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गुलाटी या त्यांच्या विद्यार्थिनीसोबत डान्स करताना दिसत आहेत. मुलीने तिच्या डान्स स्टेप्स दाखवताच शिक्षिकेने त्या डान्स स्टेप्स फॉलो केल्या आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

“विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायला आवडते. त्यांना भूमिका बदलणे आवडते. ‘मॅडम आप भी करो, मैं सिखाऊंगी’असा मजकूर ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना गुलाटी यांनी कॅप्शनमध्ये लिहला आहे.
लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. शाळेतील वर्गामध्ये जिवंतपणा आणल्याबद्दल नेटकऱ्यांनी या शिक्षेकेचं कौतुक केलं आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com