बापरे…! कोरोनामुळे जगभरात २९ कोटी विद्यार्थी शाळाबाह्य

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  गेल्या काही दिवसापासून  कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या फैलावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इटली आणि अन्य देशांमध्ये सुमारे २९ कोटी विदयार्थी हे शाळेत जात नाहीत.

दरम्यान आतापर्यंत ९५ हजारांहून अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे आणि ३,२०० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८० देशांमध्ये या जीवघेण्या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्यामुळे सर्वच देश कोरोनाबाबत खबरदारी घेताना दिसत आहेत.

कॅलिफोर्नियात तर गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. अमेरिकेत बळींची संख्या ११ वर पोहोचली आहे. प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर एका क्रूझ शीपला वेगळं ठेवण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडमध्येही एका ७४ वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला आहे. हा येथे कोरोनाचा पहिला बळी आहे. इराणमध्ये कोरोनाने ९२ जणांचा बळी घेतला आहे, तेथेही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि काही शाळातील मुले हे घरीच राहत आहेत.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.