करिअरनामा । महाराष्ट्रातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमधून गट अ, ब, क, ड ची 31 डिसेंबर 2019 अखेर दोन लाख 193 पदे रिक्त असल्याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून कऱण्यात आला आहे. त्यात सरळसेवेच्या एक लाख 41 हजार 329 पदांचा समावेश आहे. याखेरीज पदोन्नती मिळाल्यावर 58 हजार 864 पदांचाही यात समावेश होणार आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारतर्फे 72 हजार पदांची मेगाभरती करण्यात येणार होती. मात्र, निवडणूक आचारसंहिता काळात ही भरती थांबली. राज्यात सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 70 हजार पदांच्या मेगाभरतीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय बहुचर्चित महापोर्टलद्वारे होणाऱ्या भरतीवर फुली मारण्यात आली होती.
नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने भरतीचे धोरण स्वीकारण्यात आले. अशातच, शिक्षकभरतीसाठी आंदोलकांशी संवाद साधत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांच्या मेगाभरतीचे संकेत दिले. मराठी भाषा विभागामुळे शिक्षकांच्या 20 हजार रिक्त जागा झाल्या. निवृत्तीमुळे दहा हजार पदे रिक्त होतील. मागील सरकारच्या भरतीमधील 24 हजारांपैकी 12 हजार पदे रिक्त राहिली, अशी माहिती देण्यात आली.
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.