करिअरनामा ।राज्यसरकार येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या 913 रिक्त पदांपैकी 574 पदांची भरती करणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना दिली.
‘नियुक्ती करण्यात येणाऱ्या 574 पदांपैकी 304 पदांची नव्याने भरती करण्यात येणार असून उर्वरित 270 पदे बढतीद्वारे भरण्यात येतील.’ असे देखील स्पष्ट केले.
सध्याच्या भरती प्रक्रियेनुसार जिल्हाधिकारी, ज़िल्हापरिषद अध्यक्ष, व जिल्हा शैल्य चिकिस्तक यांच्याकडे डॉक्टर भरतीचे अधिकार असून सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना मासिक वेतन म्हणून 60,000 रुपये एवढं वेतन देण्यात येतं.
नोकरी शोधताय ?माहिती कुठून मिळेल याची भीती आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”