परकीय विद्यार्थ्यांचे भारतात शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसंच देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी, उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा टक्का वाढवण्यासाठी ‘नॅशनल रिसर्च फाउन्डेशन’ची घोषणा करण्यात येणार असल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली आहे. येत्या काळात संशोधनावर जास्त भर देण्यात येणार असून संशोधन फेलोशिप्स आणि अनुदानांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.
रोबॉटिक्स, अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रांमधील संशोधनावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसंच शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमातही आमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. तेव्हा नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे देशातील शैक्षणिक क्षेत्राची परिस्थिती सुधारते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाचे –
पुणे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची भरती
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक पदासाठी भरती
एमपीएससी – आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख
अर्थसंकल्पामध्ये युवकांना सरकारकडून मोठी ‘भेट’